पणजी :
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणाचे तपासकाम गतीने होत आहे. या प्रकरणात कालपर्यंत सात मुख्य संशयितांना अटक करण्यात आली होती. काल शनिवारी तब्बल 14 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील 11 जणांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे. हल्लाप्रकरणात संशयितांनी पलायनासाठी ज्या दुचाकींचा वापर केला होता. त्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
संशयितांनी हल्ल्याच्यावेळी शस्त्रांचा वापर करण्यात आला होता, असा संशय असून पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. तसेच या प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असलेल्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची कसून उलटतपासणी करण्यात येत आहे.








