प्रतिनिधी / फोंडा
ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज भरण्याच्या तिसऱया दिवशी बुधवार 20 रोजी फोंडा तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीमधून 14 उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामुळे आत्तापर्यंत 22 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. वाडी तळावली पंचायतीमधून सर्वाधिक 4 तर कुर्टी खांडेपार व तिवरे वरगांव पंचायतीमधून प्रत्येकी 2 अर्ज भरण्यात आले.
बेतोडा निरंकाल पंचायतीच्या प्रभाग 3 मधून प्रशांत गणेश गावकर, वाडी तळावली पंचायतीच्या प्रभाग 1 मधून अमिता धिरेंद्र तळावलीकर व जयशिला जगदिश सावंत तळावलीकर, प्रभाग 3 मधून दिलेश प्रभाकर गांवकर तर प्रभाग 6 मधून भारती नामदेव नाईक यांनी अर्ज भरले आहे.
भोम अडकोण पंचायतीच्या प्रभाग 6 मधून श्रद्धा स्वप्नील फडते गांवकर, मडकईच्या प्रभाग 7 मधून पांडू दामू गावडे, बेतकी खांडोळाच्या प्रभाग 9 मधून रेंडेल इस्तेवीनजोस आंतोनिओ कायतानो फर्नांडिस, कुर्टी खांडेपार पंचायतीच्या प्रभाग 4 मधून शैलेश रमेश शेट तर प्रभाग 8 मधून कादिर मोहिद्दीन मुल्ला, केरी पंचायतीच्या प्रभाग 7 मधून निकिता नंदकुमार नाईक, तिवरे वरगांवच्या प्रभाग 8 मधून महादेव अनंत गावडे व मारिया मॅथ्यू फर्नांडिस तर वळवई पंचायतीच्या प्रभाग 1 मधून काशिनाथ कृष्णनाथ नाईक यांनी अर्ज भरले आहेत.
सात पंचायतीमधून अद्याप एकही अर्ज नाही
तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीपैकी कुंडई, दुर्भाट आगापूर, शिरोडा, बोरी, पंचवाडी, वेलिंग प्रियोळ, वेरे वाघुर्मे या सात पंचायतीमधून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.









