Chiplun Crime News : गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असतानाच शहरातील मध्यवर्ती भागातील भोगाळे येथील युनियन बॅंकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल १४ लाखांची रोख रक्कम लंपास केली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.युनियन बॅंकेकडून या बाबतची तक्रार गुरुवारी चिपळूण पोलीस ठाण्यात दिल्यानंतर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक रवींद्र कदम घटनेची पाहणी केली असून पुढील तपास सुरु आहे.
भोगाळे येथे युनियन बॅंकेच्या शाखेच्या परिसरातच बॅंकेचे एटीएम सेंटर आहे. बुधवारी गणेशोत्सवानिमित्त बॅंकेला सुट्टी होती. त्याची संधी साधून चोरट्यांनी पहाटे ४ वाजता एटीएम फोडले. गुरूवारी सकाळी हा प्रकार उघड झाल्यानंतर बॅंंकेकडून या बाबतची माहिती चिपळूण पोलीस ठाण्यात देण्यात आली.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
पोलिसांनी गुन्हा नोंद करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेअसून, पुढील तपास सुरू केला आहे. मागील काही वर्षे एटीएम फोडून चोरी करण्याचे प्रकार थांबले होते. मात्र गणेशोत्सवात हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









