वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या बेल्ट आणि रोड इंटरनॅशनल युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 14 मुष्टीयोद्धांनी आपल्या विविध वजन गटातून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
सदर स्पर्धा 17, 19 आणि 23 वर्षांखालील वयोगटात घेतली जात असून या स्पर्धेत भारताच्या 58 सदस्यांचे पथक सहभागी झाले आहेत. भारताचे 20 मुले आणि 20 मुली अशी एकूण 40 मुष्टीयोद्धांनी 17 वर्षांखालील वयोगटात आपला सहभाग दर्शविला होता. 10 मुली आणि चार मुले यांनी आपल्या वैयक्तिक वजन गटातून कझाकस्तान, इराण, कोरिया, उझ्बेक, फिनीपिन्स व चीनच्या स्पर्धकांना पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. भारताच्या ध्रुव खर्बने 46 किलो गटात, फलकने 48 किलो गटात, पियुषने 50 किलो गटात, उदामसिंग राघवने 54 किलो गटात तसेच 52 किलो गटातून अदित्य तसेच 54 किलो गटात आशिष यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. उदयसिंग, देवेंद्र चौधरी, जयदीप सिंग आणि लोव्हेन गुलिया यांचे आव्हानही संपुष्टात आले आहे. मुलींच्या विभागात 46 किलो गटात लक्ष्मी तसेच खुशीचे, 60 किलो गटात राधा मणी, 54 किलो गटात चंद्रिका, 75 किलो गटात ज्योती, 80 किलोवरील गटात अनुष्का यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. दरम्यान चहात, हिमांशी, हरनूर, अनिष्का, भक्ती आणि शिवानी यांचे आव्हान संपुष्टात आले.









