3 ते 16 ऑक्टोबरदरम्यान राहणार सुटी
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकात दसरा मोठय़ा उत्साहात साजरा होत असल्याने शाळांना दसऱयाला सुटी दिली जाते. यावषी एकूण 14 दिवस दसरा सुटी देण्यात येणार आहे. दि. 3 ते 16 ऑक्टोबरदरम्यान दसरा सुटी जाहीर करण्यात आल्यामुळे यावषी जल्लोषात दसरा साजरा करता येणार आहे.
शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार यावषी एकूण 60 सार्वजनिक सुटय़ा देण्यात आल्या आहेत. तर शैक्षणिक वर्षात 256 दिवस शाळा भरविली जाणार आहे. यावषी 16 मेपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. दसरा सुटी नेमकी किती दिवस मिळणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती.
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. ते भरून काढण्यासाठी यावषीचे वर्ष कलिका चेतरीके म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्येक उपक्रम झाला की त्याचे मूल्यमापन करावे लागत आहे. काही शाळांनी 19 तर काहींनी 26 सप्टेंबरपासून सहामाही परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थी अभ्यासामध्ये दंग असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.









