रत्नागिरी :
जिल्ह्यात मातामृत्यूचे प्रमाण कमी असले तरीही बालमृत्यूचे प्रमाण पाहता गेल्या वर्षभरात 137 बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे. तर प्रसूतीदरम्यान 2 मातांचा मृत्यू झाला आहे. परंतु राज्याच्या तुलनेत रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर कमी असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे. सध्या देशाचा बाल मृत्यूदर साधारण दरहजारी 10 इतका आहे.
आरोग्य विभाग सातत्याने अर्भक आणि बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करत असल्यामुळे बालमृत्यूदरात घट होत आहे. परंतु रत्नागिरी जिह्याचा बाल मृत्यूदर फारसा कमी होताना दिसत नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये हा मृत्यूदर जैसे थे आहे. 2022-23 मध्ये 180 बालकांचा मृत्यू झाला होता तर 2023-24 मध्ये 137 बालकांचा मृत्यू झाला आहे.
बालमृत्यू आणि मातामृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभाग अनेक उपाययोजना करत आहे. अन्न व पोषण स्वच्छ व आरोग्यदायी बनवण्यासाठी सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या दरापेक्षा रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर कमी असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.








