ऑनलाईन टीम / जिनेव्हा :
कोरोनाच्या ‘डेल्टा’ या सर्वात धोकादायक व्हेरिएंटने जगभरातील 135 देशात थैमान घातले आहे. अल्फा व्हेरिएंटने 182 देशात, बीटा व्हेरिएंटने 132, तर गॅमा व्हेरिएंटने 81 देशांमध्ये हातपाय पसरले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक विज्ञान महामारी अपडेटमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे.
20.17 कोटी रुग्ण कोरोनाच्या विळख्यात
जगभरात आतापर्यंत 20.17 कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 18.14 कोटी रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 1.59 कोटी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 42.80 लाख रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, 26 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान जगभरात 40 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 64 हजार रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाच्या धोकादायक व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसऱयग्ना लाटेचा धोका भारतासह अन्य देशांना आहे.