प्रतिनिधी,कोल्हापूर
Raju Shetti News : एनडीएमध्ये जायचे की इंडिया आघाडीत जायचे याबाबत मी अद्यापही ठरवलेले नाही.जी आघाडी शेती आणि शेतकरी यांच्याबद्दलची धोरणे स्पष्ट करेल त्या आघाडीला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेईन,असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रागतिक पक्ष आयोजित कोल्हापूर विभागीय मेळाव्याला संबोधल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी तयार केलेला भूमी अधिग्रहण कायदा राज्यात का लागू केला नाही,माजी संपतराव पवार-पाटील,श्रीपतराव शिंदे यांना निवडणूकी कोणी हरवले,शेती उत्पादनासाठी किमान हमीभाव कायदा का केला नाही या प्रश्नांची उत्तरे काँग्रेस,राष्ट्रवादीने जनतेला द्यावीत.कृषी विषयक धोरणावरही सखोल चर्चा झाली पाहीजे. पण तसे होताना दिसत नाही.
राजू शेट्टी पुढे म्हणाले, समविचारी पक्षांनी एकत्र येऊन प्रागतिक पक्षांची मोट ही दोन वर्षांपूर्वीच बांधली आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम फक्त आणि फक्त प्रागतिक पक्षच कऊ शकतात.कारण या पक्षांमधील नेते, कार्यकर्त्यांना ना ईडीची भीती असते ना सीबीआयची भीती असते.हे नेते व कार्यकर्ते लोकहितासाठी रस्त्यावर चळवळी करतात.त्यामुळे त्यांना कशाचीही डर नसते.
शेट्टी पुढे म्हणाले की एकेकाळी मधू दंडवते यांच्यासारखे मातब्बर नेते सभागृहात होते.पण त्यांचा पराभव कोणी केला. मात्र संपतराव पवार-पाटील,श्रीपतराव शिंदे यांचा पराभव काँग्रेसने केला.प्रागतिक पक्षांचा बुरूज ढासळत होता त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते गप्प होते.शेती तोट्यात गेल्यानेच आज मराठा समाज आरक्षण मागत आहे. मात्र ते मिळेल,अशी व्यवस्था केलेली नाही.भारतीय जनता पक्षावर तर कुणाचाच विश्वास नाही.हा पक्ष शेतकरी हिताची भूमिकाच घेत नाही.








