भिंतीत गाडलेल्या अवस्थेत होती बाटली
स्कॉटलंडच्या एका ऐतिहासिक लाइटहाउसच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना इंजिनियर्सना एका बाटलीत 132 वर्षे जुने पत्र मिळाले आहे. या पत्रात कामाशी निगडित गोष्टी नमूद होत्या. 36 वर्षीय इंजिनियर रॉस रसेल यांना हे पत्र मिळाले आहे. हे पत्र पाहून मी पूर्णपणे आश्चर्यचकित झालो होतो. लाइटहाउसच्या एका भिंतीत आम्हाला बाटली मिळाली. या बाटलीतच हे पत्र होते. हे लाइटहाउस 1817 मध्ये निर्माण करण्यात आले होते असे रॉस यांनी सांगितले आहे.
लाइटहाउसच्या मालकाने देखील याबद्दल माहिती दिली आहे. 1892 मध्ये इंजिनियर आणि लाइटहाउसच्या देखभालदारांकडून क्विल शाईद्वारे हा संदेश लिहिला हेता. ते कॉर्सवॉल चौकीच्या टॉपवर एक नवी फ्रेन्सेल लेन्स लावत होते. जे एकप्रकारचा प्रकाश देणारा कंदील होता. याच उपकरणावर वर्तमानात इंजिनियर काम करत होते असे त्यांनी म्हटले आहे.
1892 मधील पत्र
सप्टेंबर 1892 ची तारीख या पत्रावर आहे. हा कंदील जेम्स वेल्स इंजिनियर, जॉन वेस्टवुड मिलराइट, जेम्स ब्रॉडी इंजिनियर, डेव्हिड स्कॉट लेबरर, जेम्स मिल्ने अँड सन इंजिनियर्स, मिल्टन हाउस वर्क्स, एडिनबर्गच्या फर्मकडून मे ते सप्टेंबर महिन्याच्या दरमान स्थापित करण्यात आला होता आणि गुरुवारी रात्री 15 सप्टेंबर 1892 रोजी तो पुन्हा पेटविण्यात आला असा उल्लेख या पत्रात आहे.
उपकरणाचा होता तपशील
सध्या स्थानकावर जॉन विल्सन प्रिंसिपल, जॉन बी हेंडरसन प्रथम सहाय्यक, जॉन लॉकहार्ट द्वितीय सहाय्यक हे देखभालदार होते. लेन्स आणि मशीनचा पुरवठा जेम्स डोव अँड कंपनी इंजिनियर्स ग्रीनसाइड एडिनबर्गकडून करण्यात आला होता. विलियम बर्नेस, जॉन हॅरोवर, जेम्स डोड्स यांच्याकडून स्थापित करण्यात आली होती. हे सर्व जण कंपनीचे इंजिनियर होते असा तपशील पत्रात आहे.
याच उपकरणांचे सुरू होते नुतनीकरण
इंजिनियर्सच्या ग्रूपने आव्हानात्मक प्रकल्प पूर्ण केल्यावर हे पत्र लिहिले हेते, ज्यानंतर त्यांनी ते जुन्या काचेच्या बाटलीत कॉर्कसोबत भरले होते. हे पत्र सागरी नेव्हिगेशन स्टेशनच्या भिंतीच्या आत असलेल्या एका रिकामी स्थानात ठेवण्यात आले होते.
हे पत्र आमच्यासाठी होते
लाइटहाउसचे देखभाल करणाऱ्या टीमसाठी हे पत्र चकित करणारे होते. हे पत्र आमच्यासाठीच लिहिले गेले होते असे त्यांना वाटले. पत्रात वर्णन असलेल्या उपकरणांवर काम करताना हे पत्र मिळणे एक अजब योगायोग होता असे मिलर यांनी म्हटले आहे. रॉबर्ट मरे नावाच्या लाइटहाउसच्या किपर्सपैकी एकाचे वंशज युआन मरे यांनी या शोधामुळे आपण स्तब्ध झाल्याचे नमूद केले आहे.









