मॉस्को
रशियाची राजधानी मॉस्कोवर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला झाला आहे. काही दिवसांपूर्वी ज्या इमारतीवर हल्ला झाला होता, तीच इमारत पुन्हा लक्ष्य ठरली आहे. या इमारतीत अनेक शासकीय कार्यालये असल्याचे समजते. युक्रेनकडून 3 ड्रोन्सद्वारे हा हल्ला करण्यात आला आहे. रशियाच्या सुरक्षा यंत्रणेने यातील 2 ड्रोन्स आकाशातच नष्ट केले आहेत. परंतु एक ड्रोन इमारतीपर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरल्याचा दावा मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी केला आहे.









