जिल्ह्यात आतापर्यंत 306 उमेदवारांकडून एकूण 360 अर्ज दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्ह्यातील 18 मतदारसंघात विधानसभा निवडणूक होत असून गुऊवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी तब्बल 131 अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यामधील 18 मतदारसंघात 306 उमेदवारांकडून एकूण 360 अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवार दि. 21 रोजी अर्जांची छाननी होणार असून सोमवार दि. 24 रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
निपाणी मतदारसंघातून गुऊवारी 9 अर्ज, चिकोडी 6, अथणी 4, कागवाड 5, कुडची 8, रायबाग 6, हुक्केरी 5, अरभावी 8, गोकाक 10, यमकनमर्डी 8, बेळगाव उत्तर 15, बेळगाव दक्षिण 9, बेळगाव ग्रामीण 13, खानापूर 6, कित्तूर 8, बैलहोंगल 1, सौंदत्ती 3, रामदुर्ग 7 असे अर्ज दाखल झाले आहेत. शेवटचा दिवस असल्यामुळे अनेकांनी अर्ज दाखल केले.
अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बेळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 18 मतदारसंघ आहेत. या निवडणुकीची सर्व ती तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यात एकूण 38 लाख 33 हजार 37 हून अधिक मतदार आहेत. त्यामध्ये संपूर्ण राज्यात युवा मतदारांची सर्वाधिक बेळगाव जिल्ह्यात नोंद झाली आहे. एकूण जिल्ह्यामध्ये 79 हजाराहून अधिक युवा मतदार असून ते आता पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
मतदानासाठी जिल्ह्यामध्ये एकूण 4 हजार 434 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 19 लाख 36 हजार 887 पुरूष मतदार तर 18 लाख 96 हजार 150 महिला मतदार होते. त्यामध्ये आणखी काही मतदारांची वाढ झाली आहे.









