कसबा बीड,प्रतिनिधी
Ganesh Murti Visarjan Kolhapur : कोगे तालुका करवीर येथे 13 वर्षे गणेशमूर्ती व निर्माल्य दान उपक्रम शिवशाहू विचार मंच व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या माध्यमातून राबवला जात आहे.त्यासाठी ग्रामस्थांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. नदी प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनास सहकार्य केले.एकोपा आणि सलोखा राखण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र य़ेत वाजत-गाजत एकत्रित घरगुती बाप्पाला निरोप दिला.
पाणी म्हणजे जीवन आहे ते स्वच्छ राहणे काळाची गरज आहे.नदी प्रदूषण म्हणजे आरोग्यासाठी हानिकारक आहे. निर्माल्य दान यासाठी लोकांचे सहकार्य चांगले मिळाले असे सांगलीचे तहसिलदार अनंत गुरव यांनी गौरवोव्दार काढले.
यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सरपंच सौ बनुताई यादव,उपसरपंच,सर्व सदस्य तसेच शिवशाहू विचार मंच मार्फत दिपक पाटील,कुंभी कासारी साखर कारखाना व्हा .चेअरमन विश्वास पाटील,कुंभी बॅक संचालक रणजीत पाटील,व माजी तंटामुक्त अध्यक्ष गणपती मिठारी,कै.सखाराम पाटील दूध संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, तहसीलदार अनंत गुरव,समन्वयक विश्वनाथ मोरे,सर्व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निर्माल्य दान उपक्रम राबविण्यात आला.
गणेश चतुर्थीपासून अत्यंत उत्साहामध्ये गणपती बाप्पा मोरया करत बाप्पाचे आगमन झाले.ढोल ताशाच्या गजरात,लेझीम,झांज पथक,मर्दानी खेळ अशा विविध वाद्याच्या व सांस्कृतिक कार्यक्रमाचा सहभाग नोंदवत गणेश चतुर्थी दिवशी पाडळी खुर्द,कोगे,महे,कसबा बीड ,शिरोली दुमाला ,चाफोडी आदी सर्व भागात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले.
आगमनापासून विसर्जन दिवसाच्या कालावधीमध्ये काही ठिकाणी विविध प्रकारचे देखावे,प्रवचन, कीर्तन, भजन सेवा, तर काही ठिकाणी आरोग्य शिबिर, व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन यावर्षी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करून संपूर्ण पाच दिवस सर्व अबालविरुद्ध भक्तीमध्ये नाहून गेलेत. गेली पाच दिवस अत्यंत भक्ती भावाने शुद्ध करणारे सर्वांच्या लाडक्या बाप्पाची सकाळ संध्याकाळ आरती करत घरामध्ये गोड नैवेद्य व आनंदमय वातावरणामध्ये गणपतीची पाच दिवस केलेली सेवा मान्य करून घे देवा अशीच मनोमन प्रार्थना करत आज कसबा बीड परिसरामध्ये बाप्पास निरोप देण्यात आला.