वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियातील शहर कोस्ट्रोमा येथे एका खाद्यपेयगृहाला लागलेल्या आगीत किमान 13 जण जळून खाक झाले आहेत, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या दुर्घटनेत पाच लोक जखमीही झाले आहेत. मृतांची संख्या 15 पर्यंत वाढल्याचा दावाही करण्यात आला आहे. 250 लोकांचा जीव वाचविण्यात आपत्कालिन साहाय्यता यंत्रणेला यश आल्याचा दावा करण्यात येत आहे. कॅफेला आग लागल्यानंतर त्याचे छप्पर कोसळले. त्यामुळे जीवितहानीत वाढ झाली. पाच तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली









