रविवारी ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारताचा 209 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाला कोट्यावधी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला 13.2 कोटी तर अंतिम फेरीतील पराभवाचा सामना करणाऱ्या भारतीय संघाला 6.5 कोटी रुपये मिळाले आहेत. आयसीसीकडून याआधीच बक्षीसाची रक्कम जाहीर करण्यात आली होती. रविवारी फायनल संपल्यानंतर विजेत्या संघांला गौरवण्यात आले.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील बक्षीस रक्कम
- ऑस्ट्रेलिया- 13.2 कोटी रुपये
- भारत – 6.5 कोटी रुपये
- दक्षिण आफ्रिका – 3.72 कोटी रुपये
- इंग्लंड – 2.89 कोटी रुपये
- श्रीलंका – 1.65 कोटी रुपये
- न्यूझीलंड – 82 लाख
- पाकिस्तान – 82 लाख
- वेस्ट इंडिज – 82 लाख
- बांगलादेश – 82 लाख.









