नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी एका मोहिमेदरम्यान 13 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे बांगलादेशी नागरिक अवैध मार्गाने भारतात दाखल झाले होते. या बांगलादेशी नागरिकांकडून काही दस्तऐवज हस्तगत करण्यात आले आहेत.
दक्षिण दिल्ली जिल्ह्यात 13 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. हे बांगलादेशी नागरिक भारतात अवैध वास्तव्य करत होते. दिल्लीत अवैध बांगलादेशींच्या विरोधात शोधमोहीम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दिल्लीच्या अनेक भागांमध्ये बांगलादेशी मोठ्या संख्येत राहत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मागील काही काळापासून या बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली जात आहे.









