दहशतवादविरोधी पोलिसांची नाखरे गावात कारवाई -जून २०२४ पासून अवैधरित्या वास्तव्य न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी
पावस :
तालुक्यातील नाखरे कालकरकोंड परिसरात चिरेखाणीवर काम करणाऱ्या १३ बांगलादेशीय नागरिकांना अटक करण्यात आली. मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी दहशतवादाविरोधी शाखेने ही कारवाई केली. जून २०२४ पासून हे बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सर्व संशयितांविरुद्ध पूर्णगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच संशयितांना मंगळवारी सायंकाळी न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची रवानगी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत करण्यात आली.








