अजय देवगणच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला
अभिनेता अजय देवगण याच्या ‘भुज ः प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा चित्रपट 13 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो दिसून येईल. चित्रपटात अजय समवेत संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, एमी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर यासारखे कलाकार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर 12 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या तारखेसह चित्रपटाचे मोशन पोस्टरही सादर करण्यात आले आहे.
1971 मधील युद्धाची कथा

हा चित्रपट 1971 मध्ये भारत-पाक युद्धाची कथा दर्शवितो. भुज वायुतळाचे प्रभारी स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांच्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. चित्रपटात कर्णिक यांची भूमिका अजय देवगण साकारत आहे. पाकिस्तानकडून मोठय़ा प्रमाणात बॉम्बवर्षाव होऊन देखील कर्णिक यांनी वायुतळ सुरू ठेवला होता. त्यांच्यासोबत या संघर्षात वायुतळावरील 50 आयएएफ आणि 60 सुरक्षा दलांचे जवानही सामील होते.
संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकात
चित्रपटात संज्या दत्त वायुदलाचे स्काउट रणछोरदास पागी यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. अभिषेक दुधैया यांची पटकथा तसेच त्यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे.









