कर्नाटक विद्यापीठ बारावीचा निकाल जाहीर झाला असून दक्षिण कन्नड जिल्ह्याने पहिले स्थान पटकाविले आहे. बेळगाव जिल्हा २५ व्या क्रमांकावर आहे तर चिक्कोडी १६ व्या क्रमांकावर आहे. कर्नाटक शाळा साक्षरता विभागाचे महासचिव रितेशसिंग यांनी आज निकाल जाहीर केला. यंदाही विद्यार्थिनींनीच अव्वलस्थान पटकाविले आहे.
यंदा एकूण ७,०२,८२१ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. त्यापैकी २३,७५४ विद्यार्थी गैरहजर होते. एकूण ५, २४, २०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७४.६७ % निकाल लागला आहे.
६०० पैकी ५९३ गूण मिळवून तब्बसूम शेख (कला विभाग) हिने प्रथम क्रमांक मिळविला
६०० पैकी ६०० गूण मिळवून अनन्या के ए (वाणिज्य विभाग) प्रथम तर
६०० पैकी ५९६ गूण मिळवून एस एम कौशिक आणि सुरभी (विज्ञान विभाग) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
www.karresults.nic.in अथवा https://kseab.karnataka.gov.in/
या वरील दिलेल्या लिंकवर आपल्याला बारावीचा निकाल पाहता येईल.









