आज हनुमान जन्मोत्सव : विविध कार्यक्रमांचे आयोजन
पर्वरी : येथील श्री वेताळ महाऊद्र संस्थानचा श्री हनुमान जन्मोत्सव आणि श्री वेताळ मूर्ती प्रतिष्ठापनेचा 34 वा वर्धापन दिन महोत्सव दि. 6 ते 12 एप्रिलपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह होणार आहे. गुऊवारी सकाळी 6 वा. प्राजक्ता प्रदीप नाईक यांच्या यजमानपदाखाली विविध धार्मिक विधी होतील. संध्या 7 वा. श्रींची पालखी व रात्री रायकर बंधुतर्फे दोन अंकी संगीत नाटक ‘कुलवधू’ सादर होईल. शुक्रवार दि. 7 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता आराडीवाडातील महिलांतर्फे 2 अंकी कोकणी नाटक ‘आजी घरान मावशी दारान’ सादर होईल. तुळशीदास धोणशीकर लेखक असून दिग्दर्शक शेखर उसगांवकर आहेत. शनिवार दि. 8 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता सातिंगणनगर वाड्यातर्फे ‘जपुन पाऊल टाक’ नाटक सादर होईल. नाटकाचे लेखक डॉ. गणेश हिर्लेकर आहेत. रविवार दि. 9 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता लिमावाडातर्फे ‘तुच माझी साऊली’ हे संगीत सामाजिक नाटक सादर होईल. नाटकाचे लेखक साईदास आपटे आहेत. सोमवार दि. 10 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता भुतकीवाड्यातर्फे ‘वादळ शिरलंय घरात’ नाटक सादर होईल. त्याचे लेखक कैलास नलावडे आहेत. मंगळवार दि. 11 रोजी सकाळी मुळस्थान भाटात पूजा, श्री विष्णू सहस्त्रनाम जप हवन होईल. त्याचे यजमान स्मिता श्रीपाद नर्से असतील. सायंकाळी बाजार व कासकरवाड्यातर्फे दोन अंकी कोकणी नाटक ‘माय कास्ताद सुन वस्ताद’ सादर होईल. त्याचे लेखक तुळशीदास धोणशीकर तर दिग्दर्शक दुर्गादास नाईक आहेत. बुधवारी दि. 12 रोजी वर्धापन दिन महोत्सव होणार आहे. यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक विधी होतील. संध्या. 6.30 वाजता सुवासिनींच्या हस्ते श्रींस दिवजांची आरती नंतर पालखीतून मिरवणूक, पावणी, आरती व तीर्थप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.









