कंग्राळी खुर्द येथील श्री वरसिद्धीविनायक मंदिराचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त मंगळवार १६ एप्रिल रोजी पहाटेपासून महागणाभिषेक, गणहोम, महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मधू पाटील आणि केदारी कंग्राळकर यांनी सपत्नीक श्री वरसिध्दिविनायकाला दुग्धाभिषेक व जलाभिषेक केला.
विठ्ठल रखुमाई महिला भजनी मंडळ आणि गीता तबला वादन भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वारासिद्धिविनायक मंडळाच्यावतीने दुपारी महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला.

विविध धार्मिक कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी पंडित पाटील, विनायक पाटील, संदीप दावतार, दिपक पाटील, सचिन शिवनगेकर, निलेश विचारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.










