मेष
स्पर्धात्मक योग आहे आणि इथे प्रत्येकाची प्रत्येकाला स्पर्धा आहे याची जाणीव करून देणारा हा आठवडा असेल. कुटुंबीय असो किंवा जवळचे असो किंवा कामाच्या ठिकाणी काम करणारे असो प्रत्येक जण आपला स्वार्थ साधताना दिसेल. आणि याच वेळेला आपण कुठे कमी पडत आहोत का ? असा प्रŽ पडणे स्वाभाविक आहे. संयमाने काम घ्या.
नागकेशर जवळ ठेवा
वृषभ
केलेल्या मेहनतीचा योग्य तो परतावा मिळण्याची शक्मयता आहे पण यामध्ये कोणाचे तरी मन दुखावले जाईल अशी ही शक्मयता आहे. कौटुंबिक समाधानाच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा ठरेल. दूरचे नातेवाईक आणि जवळची मित्रमंडळी यांच्यासोबत आनंद साजरा कराल. कुठलीही दुखणे अंगावर न काढले तर बरे होईल.
चकमकीचा दगड जवळ ठेवा
मिथुन
अजाणतेपणी कुणाची तरी केलेली चेष्टा कुचेष्टेचे स्वरूप घेऊ शकते. नात्यांमधील कॉम्प्लकेशन्स वाढण्याची शक्मयता आहे. बोलणे आणि समजणे यात फरक आल्याने गैरसमज पसरू शकतात. आर्थिक दृष्टीने हा आठवडा समाधानकारक असेल पण बराच वेळ जवळच्या लोकांमध्ये गैरसमज काढण्यात जाऊ शकतो.
हिरवी काचेची गोटी जवळ ठेवावी
कर्क
आरोग्याच्या दृष्टीने तितकासा अनुकूल काळ नसला तरी पैशांच्या बाबतीमध्ये भाग्यवान ठराल. अचानक पैसा मिळाल्याने काहीसे आश्चर्य वाटू शकते. व्यवसायिकांना आपल्या व्यवसायाबद्दल जास्त जागरूक राहण्याची गरज आहे कारण इतर लोकांच्या डोळ्यात खुपेल असे वर्तन घडू शकते. महिलांनी अफवांकडे लक्ष देऊ नये.
पौर्णिमेला दुधाचे दान द्यावे
सिंह
या आठवड्यात कोणत्याही प्रकारची मग्रूरी करून उपयोगाचे नाही. तुमच्या आत्मविश्वासाला किंवा अहंकाराला ठेच लागण्याची शक्मयता नाकारता येत नाही. जुने मित्र भेटतील. त्यांच्या बरोबर पार्टी करण्याचा प्लॅन कराल. घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडल्यामुळे थोडी धावपळ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी त्रास संभवतो.
तांब्याचे नाणे जवळ ठेवा
कन्या
या आठवड्यात काही प्रसंग असे येतील जिथे तुम्ही घाबरून किंवा भांभाऊन जाऊन चालणार नाही. तुमच्या घरातील सदस्यांना तुमच्या मदतीची गरज असेल, तर ती मदत आर्थिक स्वरूपाची किंवा इतर काही असू शकते. लहान मोठ्या दुखापतींपासून सावध राहण्याची गरज आहे. कोणताही व्यवहार करत असताना कागदोपत्री ठाम रहा.
हिरवा हात ऊमाल जवळ ठेवा
तूळ
जितकी जास्त गुंतवणूक तितका जास्त फायदा असा साधारण अंदाज असेल तर आजूबाजूच्या परिस्थितीकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन, रिस्क पॅक्टर लक्षात घेऊन मगच गुंतवणूक करा. या आठवड्यात पैशांच्या देवाण घेवाणाच्या बाबतीत सावध राहिलेले उत्तम राहील. मित्राकडून फसवणूक होण्याची शक्मयता आहे.
पक्ष्यांना पाच प्रकारचे धान्य घाला
वृश्चिक
एक ना धड भाराभार चिंध्या असा काहीसा अनुभव या आठवड्यामध्ये येऊ शकतो. कामे येतील पण ती पूर्ण करण्यासाठी अनेक लोकांना भेटावे लागेल किंवा धावपळ करावी लागेल. काही कामे अपूर्ण राहिल्याने मनस्ताप होण्याची शक्मयता आहे. कौटुंबिक समस्यांना उपाय शोधताना ज्येष्ठांची मदत घ्यायला विसरू नका.
मजुरांना ताक वाटा
धनु
लोकांच्या अपेक्षा वाढल्यामुळे मानसिक तणावांमध्ये वाढ होण्याची शक्मयता आहे. त्यात घरची जबाबदारी आणि कामाचे ओझे यामुळे मानसिक थकवा येईल. तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा नुकसानदायक ठरू शकतो. व्यापाऱ्यांना अपेक्षित नफा मिळेल. नोकरदार वर्गाला कॉम्पािटिशन चा सामना करावा लागेल.
केशराचा टिळा लावावा
मकर
आळस झटकून कामाला लागण्या ची गरज आहे. प्रत्येक कामाचे नियोजन व्यवस्थित केले तर संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते. काही लोक तुमच्या हातून चूक घडण्याची वाट बघत असताना कोणतीही रिस्क न घेतलेली बरी. या काळात कौटुंबिक वाद विवादांकडे लक्ष देण्यात वेळ घालवू नका. प्रगतीचे मार्ग सापडतील.
पिंपळाला 11 प्रदक्षिणा घाला
कुंभ
इच्छा तिथे मार्ग हा मंत्र लक्षात ठेवा. गेल्या काही दिवसांमध्ये काहीसा निगेटिव्ह पणा जो आलेला आहे त्यातून बाहेर पडून अपेक्षित रिझल्ट मिळण्याकरता प्रयत्न करणे हे आवश्यक ठरेल. तब्येत सर्वसाधारण राहील. एखाद्या फंक्शन मध्ये भाग घ्यायला प्रवास करावा लागू शकतो. तुमच्याबरोबर काम करणाऱ्यांवर अति विश्वास ठेवू नका.
छोटे मोरपीस जवळ ठेवावे
मीन
हा आठवडा म्हणजे अडथळ्यांची शर्यत असण्याची शक्मयता आहे पण तुमच्या प्रगल्भतेने आणि अनुभवाने तुम्ही आलेल्या अडचणींवर मार्ग काढाल. प्रतिस्पर्धी नमोहरम होतील. नोकरदार वर्गाला मॅनेजमेंट ची अपेक्षित मदत मिळू शकते. पैशांच्या बाबतीत थोडी काटकसर करणे गरजेचे आहे. मोठ्या टेन्शन मधून बाहेर याल.
अष्टगंध जवळ ठेवा
अनेक भगिनींना सासरी त्रास होतो. नवरा खूप तापट असतो किंवा त्याचे बोलणे मनाला खूप लागते. अशावेळी सात गुलाबाच्या पाकळ्या आणि कारल्याच्या तीन बिया लाल कापडात एकत्र घेऊन आपल्या इष्ट देवतेचा मंत्र 1100 वेळा म्हणावा. ही पुरचुंडी नवऱ्याच्या उशीच्या आत गुपचुप ठेवून द्यावी. फायदा होईल.