सांगरूळ प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान चुरशीने मतदान सुरू आहे .आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडी निवडणूक रिंगणात उतरली असून विरोधात शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी सहकार आघाडी निवडणूक लढवत आहे .संस्थेचे १८०९ सभासद आहेत. . दुपारी साडेबारापर्यंत १२६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे .
दोन्ही गटाकडून गटागटाने शक्ती प्रदर्शन करत मतदार मतदान केंद्रापर्यंत आणले जात आहेत .मतदानाची मुदत दुपारी चार वाजेपर्यंत असून मतदानानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद ओतारी यांनी दिली.









