नवी दिल्ली :
भारतातील सहाव्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी एलटीआय माइंट्री यांनी दुसऱ्या तिमाहीमध्ये 1251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. या वर्षाच्या समान तिमाहीच्या तुलनेमध्ये नफा 7 टक्के अधिक आहे. मागच्या वर्षी 1162 कोटी रुपयांचा नफा कंपनीने समान तिमाहीत मिळवला होता. मुंबईत मुख्यालय असणाऱ्या आयटी सेवा कंपनीने एकत्रित महसुलामध्ये 5.9 टक्के वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीने 9432 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीने 8905 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता.









