कुळेच्या प्रभाग 5 मधून प्रसाद गावकर बिनविरोध : दाभाळ पंचायतीमधून एकही अर्ज मागे नाही
प्रतिनिधी /धारबांदोडा
धारबांदोडा तालुक्यातील पाच पंचायतीमधून अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बुधवारी 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 124 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. कुळे शिगांव पंचायतीच्या प्रभाग 5 मधून प्रसाद गावकर हा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी हा प्रभाग राखीव आहे.
धारबांदोडा पंचायतीच्या 9 प्रभागामधून 26 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी सर्वाधिक 4 उमेदवार प्रभाग 3 व 6 मधून लढणार आहे. एकूण 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मोले पंचायतीच्या 7 प्रभागामधून 22 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 5 उमेदवार प्रभाग 3 मधून लढणार आहेत. 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. कुळे-शिगाव पंचायतीच्या 9 प्रभागामधून 26 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सर्वाधिक 5 उमेदवार प्रभाग 7 मधून लढणार आहेत. 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. या पंचायतीच्या प्रभाग 5 मधून प्रसाद गावकर हा बिनविरोध निवडून आला आहे. साकोर्डा पंचायतीच्या 7 प्रभागामधून 22 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 4 उमेदवार प्रभाग 5, 6 व 7 मधून लढणार आहेत. 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. किर्लपाल-दाभाळ पंचायतीमधून 28 उमेदवार रिंगणात असून एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही.









