इंग्लंडमधील राज्याभिषेक सोहळ्याशी आहे संबंध
121 वर्षे जुन्या कॅडबरी चॉकलेटचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. कॅडबरी ही चॉकलेट कंपनी किती जुनी आहे याचा अंदाज यातून तुम्हाला येईल. 1902 साली एका 9 वर्षीय मुलीला शाळेत हे चॉकलेट देण्यात आले होते, तेव्हा तिने ते खाऊन संपविण्याऐवजी सांभाळून ठेवले होते. 1902 साली इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) आणि महाराणी एलेग्जेंड्रा यांच्या राज्याभिषेकानिमित्त हे विशेष चॉकलेट तयार करण्यात आले होते. त्याकाळी मुलांना इतके महाग चॉकलेट सहजपणे मिळत नव्हते. याचमुळे शाळेत शिकणाऱ्या 9 वर्षीय मेरी एन ब्लॅकमोरने हे चॉकलेट खाऊन संपविण्याऐवजी ते आठवणींच्या स्वरुपात जपून ठेवले होते. हे व्हेनिला चॉकेटल मेरीच्या कुटुंबीयांजवळ दशकांपासून आहे, परंतु आता मेरी यांच्या नातीने या चॉकलेटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. मेरी यांची नात जीन थॉम्पसन आता 72 वर्षांच्या झाल्या आहेत. जीन या चॉकलेटचा टिनचा डबा घेऊन हॅनसनच्या लिलावकर्त्यांकडे पोहोचल्यावर लोकांना याच्या अस्तित्वाची माहिती मिळाली. त्या काळात ही एक मोठी भेटवस्तू होती, कारण मुलांना सहजपणे चॉकलेट मिळत नव्हते. हे स्पष्ट स्वरुपात या छोट्या मुलीसाठी अत्यंत विशेष उपहार असल्याने तिने ते जपून ठेवले असावे. डब्यावर राजे आणि महाराणींचे चित्र असल्याची माहिती हॅनसन्स ऑक्शनियर्सचे मॉर्वेन फेयरली यांनी दिली आहे.
लिलावात मिळू शकते मोठी किंमत
चॉकलेटचा लिलाव हॅनसन्समध्ये केला जाईल आणि याकरता कमीतकमी 16 हजार रुपयांची किंमत मिळेल अशी अपेक्षा आहे. याहून अधिक किंमत देखील मिळू शकते, कारण कधीकधी लोक इतिहासाच्या तुकड्यासाठी अपेक्षेहून अधिक किंमत द्यायला तयार असतात. राजघराण्याशी संबधित किंवा ऐतिहासिक गोष्टींचा कोण संग्रह करतोय यावर किंमत अवलंबून असले. 121 वर्षे जुने चॉकलेट कधीच एक्स्पायर झाले असल्याने ते खाण्यायोग्य नाही. परंतु याचा टिन उघडताच तुम्हाला अत्यंत मोहक सुगंध जाणवत असल्याचे फेयरली यांनी सांगितले आहे.









