बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि सुनिल शेट्टी हे दोन दिग्गज अभिनेते बऱयाच काळानंतर एकत्र पहायला मिळणार आहेत. ही जोडी सिनेरसिकांना आवडते मात्र मागच्या जवळजवळ 12 वर्षांपासून ही जोडी एकत्र क्रीनवर पहायला मिळाली नव्हती. पण या दोघांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच ही लोकप्रिय जोडी एकत्र मोठय़ा पडद्यावर एकत्र पहायला मिळणार आहे. एका तपानंतर संजय दत्त आणि सुनील शेट्टी करणार एकत्र काम, ‘नो प्रॉब्लेम’नंतर आता लवकरच नव्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

एकेकाळी मोठा पडदा गाजवलेले दोन मोठे अभिनेते एकत्र पहायल मिळणार आहे. केजीएफ 2 मध्ये संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच या दोघांच्या नव्या सिनेमाची घोषणा होणार आहे. संजय दत्त-सुनिल शेट्टी ही जोडी या आधीही हिट ठरली. ‘कांटे’, ‘दस’, ‘शूट आऊट ऍण्ड लोखंडवाला’ या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं आहे. 12 वर्षांआधी या दोघांनी ‘नो प्रॉब्लेम’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे..









