आटपाडी :
आटपाडी-मापटेमळा येथील समर्थ अरूण डोके या अवघ्या बारा वर्षाच्या मुलाने गळफास लावुन घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री पावणेदहाच्या पुर्वी मापटेमळा ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे घडली. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अवघ्या बारा वर्षाच्या चिमुरड्याच्या गळफासाने खळबळ माजली आहे.
आटपाडी-मापटेमळा येथील ग्रामपंचायत इमारतीजवळ पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीजवळ समर्थ डोके हा आपल्या आजीकडे वास्तव्यास होता.
रात्री पावणे दहा वाजण्याच्या पुर्वी त्याने ग्रामपंचायत मापटेमळा येथील पाण्याच्या टाकीच्या मागे गळफास लावून घेतला. त्याला शेजारी दिनेश जाधव यांनी मयत अवस्थेत आटपाडीतील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. चिमुकल्या समर्थचा गळफास घेतल्याच्या घटनेने मापटेमळ्यात मोठी खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच सपोनी जाधव, पोलीस उपनिरीक्षक खाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील आदिंनी घटनास्थळी धाव घेवुन पाहणी केली. ग्रामीण रुग्णालयातील डॉ. कारंडे यांनी गळफासाने मयत झालेल्या समर्थची वर्दी आटपाडी पोलीसांना दिली.








