वृत्तसंस्था / मोनॅको
रशियन फिल्ड आणि ट्रॅक क्रीडा प्रकारातील 12 अॅथलिट्स उत्तेजक चाचणीत 2010 साली दोषी ठरले होते. या प्रकरणी भारतीय क्रीडा लवादासमोर सुनावणी सुरू होती. या लवादाने रशियाच्या या दोषी अॅथलिट्सवर अखेर बंदीचा निर्णय घेतला आहे.
2017 साली अॅथलेटिक्स इंटिग्रेटी युनिटची (एआययू)ची स्थापना करण्यात आली होती. एआययूसमोर क्रीडा क्षेत्रातील उत्तेजक द्रव प्रकरणातील सुनावणी केली जात असे. मास्कोच्या उत्तेजक विरोधी प्रयोग शाळेने ही प्रकरणे हाताळली होती. दरम्यान रशियन शासनाकडून आतापर्यंत नेहमीच या प्रकरणावर नकारात्मक भूमिका मांडली गेली असे. पण शुक्रवारी या प्रकरणांचा निकाल सुनावण्यात आला आणि त्यामध्ये 12 रशियन अॅथलिट्सवर विविध कालावधींसाठी निर्बंध घालण्यात आले. रशियाची महिला धावपटू इलिना कोटूलेस्काय ही या प्रकरणी दोषी ठरली होती. तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. यानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन अॅथलिट्सना आंतरराष्ट्रीय फिल्ड आणि ट्रॅक स्पर्धेत सहभागावर बंदी घालण्यात आली होती.









