दिल्ली: शिवसेनेच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून लोकसभा अध्यक्षांना तसं पत्र दिलेलं आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे बंडखोर 12 खासदार उपस्थित होते. यावेळी १२ खासदारांचे स्वागत त्यांनी केले. राज्यात युतीचं सरकार स्थापन झालं आहे. ५० आमदारांनी जी भूमिका घेतली त्याला राज्यभरातून तसेच महाराष्ट्रातील जनतेनं समर्थन केलं आहे. जे अडीच वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते आता केलं आहे. जनतेच्या मनातील सरकार स्थापन केलं असल्याचे त्यांनी स्पष्टं केलं. अडीच वर्षापूर्वीच सेना-भाजप सरकार व्हायला हवं होत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्य़माशी बोलताना दिली. ओबीसी आरक्षणाबाबत वकिलांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी संवाद साधला. १२ खासदार शिंदे गटात आज सामील झाले आणि ओबासी आरक्षण या दोन मुद्यावर त्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, सरकार स्थापन होताचं अनेक लोकहिताचे निर्णय आम्ही घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी ५० हजाराचं अनुदान घेण्याचा निर्णय घेतला. पेट्रोल-डिझेलवरचा कर आमच्या सरकारनं कमी केला. शेतकऱ्यांच्या मनातील सरकार स्थापनं केलं. १२ खासदारांनाही बाळासाहेबांच्या विचारांना साथ दिली आहे. केंद्राचा महाराष्ट्र सरकारला पूर्ण पाठिंबा आहे. केंद्र आणि राज्याच्या संगनमताने राज्याचा विकास जलद विकास होणार आहे. सेना खासदारांकडूनही आमच्या विचारांचं समर्थन करण्यात येत आहे. ओबीसी आरक्षणाबाबत वकिलांशी चर्चा केली आहे. विकासासाठी काहीही कमी पडू देणार नाही याची केंद्राकडून हमी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणे हे एकमेव उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : नुपूर शर्माला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती
दरम्यान, जी भूमिका 50 आमदारांनी घेतली त्या भूमिकेचं समर्थन राज्यभरातून सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केलेलेच आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेनंही त्याचं समर्थन केलेलं आहे. 2019 ला शिवसेना-भाजप युतीत निवडणूक एकत्र लढलो होतो, गेल्या महिन्याभरात आम्ही तो निर्णय घेतला. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होतं, ते आता झालं आहे. आम्ही जनतेच्या मनातील सरकार स्थापन केलं, त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळतोय. आम्ही सगळे निर्णय तातडीनं घेण्यास सुरुवात केली. पंतप्रधानांनीसुद्धा पूर्ण पाठिंबा महाराष्ट्र सरकारला दिलाय. राज्याच्या विकासाला कुठेही काही कमी पडू दिलं जाणार नाही, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय. त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आभार मानतो, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या खासदारांवर ईडीचा दबाव असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला. संजय राऊतांचा सकाळचा शो बंद झाला आहे. ते आता दखल घेण्यासारखे नाहीत. दुसरं कोणी बोललं असतं तर दखल घेण्यासारखं होतं. मात्र, संजय राऊत दखल घेण्यासारखे नाहीत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.








