मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत शिवसेनेच्या १२ खासदारांनी भेट घेतली. काल मुख्यमंत्र्यांनी मुंबईहून ऑनलाईन बैठकी घेतली होती. यात १२ जणांनी उपस्थित लावली होती. दरम्यान आज १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. यामध्य़े कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल माने यांचा सहभाग आहे.
हमीदवाडा येथे झालेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये खासदार मंडलिक यांनी शिंदे गटासोबत जावे अशी कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली. सत्तेच्या बाजूने असेल तर आपल्याला निधी खेचून आणता येईल अशी भूमिका या मेळाव्यामध्ये मांडण्यात आली. त्यामुळे त्यांची आगामी राजकीय दिशा काय असणार याकडे राज्याचे तसेच कोल्हापूरवासियांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान आज या दोघांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा- खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात
ते बारा खासदार कोण ?
लोकसभेत शिवसेनेचे एकूण 18 खासदार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेलेल्या खासदारांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे, भावना गवळी, संजय मंडलिक, धैर्यशिल माने, सदाशिव लोखंडे, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, राहुल शेवाळे, राजेंद्र गावित यांचा समावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बारा खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता द्यावी म्हणून मंगळवारी ते लोकसभा सभापतींना भेटणार आहेत. स्वतंत्र गटाच्या प्रतोदपदी राहुल शेवाळे यांचे निवड करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








