प्रतिनिधी/सातारा
येथील एका सराफ व्यावसायिकाची 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगली येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 जानेवारी 2020 ते दि.18 जुलै 2022 या कालावधीमध्ये विशाल चंद्रकांत नार्वेकर(रा. अन्नपूर्णा भवन, गवळी गल्ली, सांगली) यांनी लग्नाची मोठी ऑर्डर असल्याचे सांगून पु.ना.गाडगीळ सराफ अँड सन्स, मारवाडी चौक, सातारा आणि सुस्वागत असेईग अँड हॉलमार्किंग सेंटर, सातारा येथे दागिने तयार करणाऱ्या सराफ व्यावसायिक देवकुमार भगवान पाटील (रा. शनिवार पेठ, सातारा) यांचा विश्वास संपादन करून ब्रेसलेट, मोहनमाळ, नेकलेस, हार, चैन कनवेल आदी 13 लाख रुपयांचे दागिने खरेदी केले. त्यापैकी 12 जानेवारी 2020 रोजी 1 लाख रुपये दिले मात्र उर्वरित 12 लाख रुपये न देता फसवणूक केल्याची तक्रार देवकुमार पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.









