घरमालकाला रात्री थांबण्यास मनाई
2013 मध्ये प्रदर्शित ‘कॉन्जुरिंग’ चित्रपटात एक भुताटकीयुक्त घर दाखविण्यात आले होते. तेव्हापासून या घराला भुतांचे घर म्हणून ओळखले जात आहे. आता या घराला एका व्यक्तीने 12 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे.
1736 मध्ये निर्माण करण्यात आलेले हे घर अमेरिकेच्या रोड आयलँडच्या सिटी ऑफ प्रॉव्हिडेन्सपासून 40 मिनिटांच्या अंतरावर आहे. हे घर 8.5 एकरात फैलावलेले आहे. हे घर पूर्वी जेन आणि कोरी हेनजेन यांच्या नावावर होते. त्यांनी हे घर 2019मध्ये 3.4 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.

1971-1980 दरम्यान पेरोन यांचे कुटुंब या घरात राहत होते. काही अनैसर्गिक घडामोडी तेथे जाणवत होत्या असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर पेरोन कुटुंबाने पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स एड आणि लॉरेन वारेन यांची मदत घेतली होती. याच कहाणीवरून कंजूरिंग हा चित्रपट तयार करण्यात आला होता.
या भुताटकीच्या घराचे नावे मालक जॅकलीन नुनेज आहेत. तो बोस्टन येथे राहणारे असून रियल इस्टेट डेव्हलपर म्हणून काम करतात. पेरोन यांच्यासोबत भागीदारी करून नुनेज या मालमत्तेचा वापर ‘लर्निंग सेंटर’प्रमाणे करू इच्छितात. तेथे उत्सुक लोकांना ‘आत्मांशी कनेक्ट करता येईल’ असे त्यांचे मानणे आहे.
हा माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक व्यवहार आहे. ही एक अशी मालमत्ता आहे जेथे माणूस आत्म्यांशी संवाद साधू शकतो असे उद्गार नुनेज यांनी काढले आहेत. नुनेज यांची ही योजना घराच्या पूर्वीच्या मालकाशी मिळतीजुळती आहे. जेन आणि कोरी हेनजेन या मालमत्तेला पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सने भाडेतत्वावर देत होते. जेन आणि कोरी हेनजेन यांनी हे घर विकताना एक अट ठेवली होती. घराच्या नव्या मालकाला रात्री तेथे राहता येणार नसल्याची त्यांची अट होती.









