कोल्हापूर :
शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील 108 मध्येच शहरातील 35 कनिष्ठ महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावर 8 ते 15 मे दरम्यान अद्यावत करावयाची आहे.
शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकारी 8 ते 16 मे दरम्यान शाखांची निश्चित करतील. 19 ते 28 मे दरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रोफाईल तयार करून प्रवेशासाठी प्राधान्यक्रम द्यावयाचा आहे.
त्यानंतर व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्यांन व इनहाऊस कोट्यातील प्रवेश निश्चिती केली जाईल. अकरावी प्रवेश प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये राबवली जाणार आहे. 19 ऑगस्ट किंवा शासन निर्धारीत केलेल्या वेळेत प्रत्यक्ष अकरावी सुरू होणार आहेत.
अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना एका वेळी एका प्रवेश अर्जाव्दारे कला, वाणिज्य व विज्ञान शाखांपैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. समान गुणवत्तेचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास जन्म दिनांकाच्या जेष्ठतेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात अल्पसंख्याक कोटा 50 टक्के असेल, कनिष्ठ महाविद्यालयात व्यवस्थापन कोटया अंतर्गत 5 टक्के जागा आरक्षित असतील, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कनिष्ठ महाविद्यालयांत व्यवस्थापनीय कोटा लागू नाही. संस्थेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यासाठी 10 टक्के इन हाऊस कोटा आरक्षित असेल. प्रवेशाच्या सर्वसाधारण गुणवत्तेनुसार चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर सर्वांसाठी खुली फेरी होणार आहे .
- तालुकानिहाय माहिती न भरलेली कनिष्ठ महाविद्यालय
तालुका कनिष्ठ महाविद्यालय
पन्हाळा 15
हातकणंगले 15
कागल 13
करवीर 11
गडहिंग्लज 11
कोल्हापूर शहर 10
राधानगरी 6
चंदगड 6
शिरोळ 5
शाहूवाडी 3
आजरा 2
भुदरगड 2
गगनबावडा 1








