शहरवासियांनी साजरा केला आनंदोत्सव
कोल्हापूर- महेश तिरवडे
राधानगरी शहराला ११७ वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त राधानगरी शहरवासीय व व्यापाऱ्यांच्यावतीने छत्रपती शाहू महाराज व त्यांच्या कन्या महाराणी राधाबाई व छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्यास व फोटोस प्रा, डॉ, विश्वास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी बापू महाराज कांबळे हस्ते स्थापनादिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
राधानगरी येथील नवी पेठ अंबाबाई मंदिराचा पायाभरणी समारंभ १८ फेब्रुवारी १९०८ शाहू महाराजांची कन्या महाराणी राधाबाई यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यांची आठवण म्हणून उजाळा देण्यात आला. राधानगरी संस्थापिका या नात्याने राधानगरी व्यापारी मंडळ व ज्येष्ठ नागरिक यांच्यावतीने अंबाबाई मंदिरामध्ये फोटो पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास विजय महाडिक(बाबा )संभाजी आरडे, विलासराव रणदिवे, राजेंद्र चव्हाण, सुहास म्हापसेकर,उमेश जाधव,दिपक शिरगांवकर, रमेश आरडे, सतीश फणसे, महेश निल्ले, महेश मोरये, मंगेश चौगले, रमन पाटील,यांच्यासह शहरवासिय या कार्यक्रमांस उपस्थित होते
Previous Article‘छावा’ ची २०० कोटींच्या क्लबमध्ये भरारी
Next Article राजकीय जोडण्या वेगावल्या








