इतिहासाशी संबंधित काही गोष्टी कालौघात कमी महत्त्वाच्या ठरत जातात. परंतु आता एका 114 वर्षे जुन्या जागेचा शोध लागला आहे. 1880 मध्ये सुरू झालेलेले एक मेडिकल स्टोअर 1909 पर्यंत चालले. ब्रिटनमध्ये विलियम व्हाइट नावाचा व्यक्ती हे स्टोअर चालवत होता. त्यांच्या मृत्यूनंतर हे स्टोअर बंद झाले. आता येथील टाळे काढण्यात आल्यावर येथे हैराण करणाऱ्या गोष्टी आढळून आल्या आहेत.

या मेडिकल स्टोअरचा शोध काही वर्षांपूर्वी झाला होता. विलियम व्हाइट यांच्या नातीने 1987 मध्ये याविषयी लोकांना सांगितले होते. आता हे स्टोअर लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. येथे लिक्विड मेडिसीनने भरलेले जार, मोजमाप करणारा स्केल, धूळीने युक्त जुना टाइप रायटर आणि अन्य सामग्री मिळाली आहे. विलियम व्हाइट यांच्या मृत्यूनंतर त्यांचे घर विकले जात असताना या अज्ञात खोलीचा शोध लागला होता. कित्येक दशकांपर्यंत हे लोकांच्या नजरेत पडले नव्हते. व्हाइट यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र चार्ल्स यांनी हे स्टोअर बंद केले होते. परंतु आता या स्टोअरमध्ये डोकावल्यास जणू काळासोबत ही जागा थबकल्याचे वाटते.
एका संस्थेला याविषयी कळल्यावर तिने या जागेचा सांभाळ करण्याची जबाबदादारी स्वीकारली. येथील सामग्रीचे चार्टिंग करण्यात आले असून पूर्वीप्रमाणेच सामग्री ठेवण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. स्टोअरमध्ये मिळालेल्या सामग्रीच्या तपासणीनंतर विलियम व्हाइट हे एक केमिस्ट होते असे दिसून आले. ते ग्रोसरीचे सामान देखील ठेवत होते. परंतु या सामग्रीला आता धोकादायक मानले जात आहे. कारण त्यावेळी बाटल्यांमध्ये बंद रसायने आता जीवघेणी ठरू शकतात. दुकानात काही वनौषधी देखील आढळल्या आहेत. लोक आता हे जुने मेडिकल स्टोअर पाहण्यासाठी येथे गर्दी करत असल्याचे संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.









