पुणे : पुणे दहशतवादी पथकाने पुण्याच्या दापोडीतून संशियित दहशतवाद्याला अटक केली आहे. जुनेद मोहोम्मद असे संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. त्याला कोर्टाने ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित दहशतवादी दोन वर्षात ६ वेळा काश्मीरला गेल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनेद हा मूळचा अकोल्याचा आहे. त्याचे वय २८ आहे. फेसबुकवरू तो तीन दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. तो जम्मू-काश्मीरमधील लष्कर-ए- तोयबाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. जम्मू-काश्मीरमधून त्याला पैसे मिळाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. आज पुण्याच्या कोर्टात सुनावणी होती त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जुनेदकडे वकिल नव्हता म्हणून कोर्टाने त्याला अॅड. यशपाल पुरोहित हे वकिल दिले होते.
अॅड. यशपाल पुरोहित सांगितले की, व्हाॅट्सअप आणि फेसबुकवरून लष्कर-ए- तोयबासाठी जुनेद तरूणांची भरती करायचा आणि त्यासाठी तो फंडिग गोळा करायचा. तसेच तो महाराष्ट्रातील ठिक-ठिकाणांचा पाहणी करायचा. दहशतवादी हल्ला कोठे घडवून आणायचा याची प्रामुख्याने त्याच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. जुनेद हा मदरसा तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता. त्याने महाराष्ट्रातील अनेक भाग पालथा घातला आहे. तो नक्की कोठे राहत होता याची तपासणी पथक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








