पुणे / वार्ताहर :
पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या एकाने 11 वर्षाच्या सावत्र मुलीवर राहत्या घरात बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी 32 वर्षीय सावत्र बापास अटक केली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या 32 वषीय आईने पोलिसांकडे पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सावत्र बापावर बलात्कार, विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलेने आरोपीशी दुसरा विवाह केला आहे. ते दत्तवाडी परिसरात एकत्र राहतात. नऊ नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पतीने तिच्या 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिच्याशी वेळोवेळी अश्लील चाळे केले. याबाबतची माहिती मुलीने आईला दिल्यानंतर आईने तात्काळ पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात तक्रार दाखल केली. याबाबत पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.









