नवी दिल्ली
प्राप्तिकर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातील करदात्यांच्या सर्व सहा श्रेणींचा डाटा सादर केला आहे. त्यानुसार, 50 लाख ते 1 कोटी रुपये उत्पन्न असलेल्या कर परतावा करणाऱ्यांच्या संख्येत 2578 टक्के वाढ झाली आहे. यावर्षी त्यांची संख्या 616 होती, तर या तुलनेत 2012-23 मध्ये ती नाममात्र 23 इतकी होती.
कोट्याधीश कर भरणाऱ्यांच्या संख्येतही 1579 टक्के वाढ झाली आहे.
739 कोट्याधीशांनी वर्षाच्या पहिल्या महिन्यात कर रिटर्न भरले आहे. मागच्या वर्षी ही संख्या फक्त 44 इतकी होती. 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कर परतावा दात्यांच्या संख्येत 85 टक्के इतकी वाढ झाली आहे. यावर्षी 3 लाख 24 हजार 891 जणांनी रिटर्न भरले. मागच्यावर्षी ही संख्या 1 लाख 74 हजार 852 इतकी होती. पहिल्या महिन्यात एकूण 3.85 लाख प्राप्तीकर दात्यांनी रिटर्न फाईल केले असल्याचे समजते.









