Sanjay Raut : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाला. तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. यावरून विरोधीपक्षांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्याऩ घटलेली घटना दुर्देवी आहे.अमित शाह यांच्या दौऱ्याची वेळ पाहूनच दुपारी कार्यक्रम घेतला. कार्यक्रमाची आखणी करताना राज्य़ सरकारने विचार करायला हवा होती अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आप्पासाहेबांचे लाखो अनुयायी आहेत पण सरकारने फक्त व्हीआयपींसाठी तयारी केली होती असा आरोप राऊतांनी केला. सायंकाळी कार्यक्रम झाला असता तर दुर्घटना टळली असती. राजकारण्यांनी श्रीसेवकांचा अंत पाहिला अशी टीका संजय राऊतांनी केली.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, आम्हाला या सोहळ्याबद्दल टीका करायची नाही. आम्ही स्वत:आप्पासाहेबांना मानतो. मात्र श्रीसेवेकांचा मृ्त्यू होणे हे दुर्देवी आहे. कार्यक्रम संध्याकाळी झाला असता तर दुर्घटना टळली असती असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








