मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये भीषण दुर्घटना
वृत्तसंस्था/ मंदसौर
मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील कचरिया गावात रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. नारायणगड पोलीस स्टेशन परिसरात प्रवाशांना घेऊन जाणारी एक व्हॅन अचानक रस्त्यावरून घसरून विहिरीत पडल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. वाहनातील काही प्रवासी बाहेर पडल्यामुळे बचावले. याचदरम्यान लोकांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या एका व्यक्तीचाही गुदमरून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री जगदीश देवदा आणि जिल्हाधिकारी अदिती गर्ग घटनास्थळी पोहोचले. एनडीआरएफ टीम आणि स्थानिक प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. विहिरीत पडलेले वाहन जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.









