ढाका / वृत्तसंस्था
बांगलादेशातील चितगाव जिह्यातील रेल्वे क्रॉसिंगवर शनिवारी भीषण अपघात झाला. रेल्वेमार्ग पार करणाऱया मिनीबसला रेल्वेने धडक दिल्यामुळे मिनी बसमधील 11 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 7 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मिरशराई उपजिल्हय़ामध्ये हा अपघात झाला. मिनी बसमध्ये कोचिंग सेंटरचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. मिनीबस रेल्वे क्रॉसिंगवरून जात असताना ढाकाकडे जाणाऱया प्रोवती एक्स्प्रेसची धडक बसल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले.









