मृत उत्तर प्रदेशमधील : पिकअप ट्रक-कंटेनरची धडक : आठ जण जखमी
वृत्तसंस्था/दौसा
राजस्थानमधील दौसा जिह्यात बुधवारी घडलेल्या एका भीषण रस्ते अपघातात 7 मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला. खातू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप ट्रकला अपघात झाल्यामुळे 7 मुले आणि 3 महिलांसह 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच आठ जण जखमी झाले असून त्यांना जयपूर रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. हे सर्व मृत उत्तर प्रदेशातील एटाह जिह्यातील रहिवासी होते. सर्वजण दौसामधील प्रसिद्ध खातू श्याम मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. सर्व मृत खातू श्यामच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर परत येत असताना भाविकांच्या पिकअप ट्रकला दौसामध्ये अपघात झाला.
स्थानिक लोकांच्या मते, बुधवारी सकाळी भाविकांचा पिकअप ट्रक खातू श्यामहून येत होता. दौसामध्ये तो एका मोठ्या ट्रकला धडकला. ही टक्कर इतकी भीषण होती 11 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत. ही घटना दौसा जिह्यात घडल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक लोक आणि प्रशासन एकत्रितपणे मदत आणि बचावकार्यात गुंतले होते. अपघाताची कारणे तपासली जात आहेत.









