अयोध्या मंदिर वर्धापन दिनानिमित्ताचे आयोजन
सांगली
जिल्ह्यात २०२३ नंतर २०२५ जानेवारी मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन राम कथा आणि रामसंकिर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उस्मानाबाद येथील समाधान महाराज शर्मा हे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. याअंतर्गत १७ जानेवारी रोजी ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि प्रमुख पाहुण्यांची उपस्थित असणार आहे. या सोहळ्यांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री २२ तारखेला येणार आहेत. आयोध्येतील राम मंदिराला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनोहर सारडा यांनी केले आहे.








