यंदाही मुलींची बाजी, 187 शाळांचा निकाल 100 टक्के, पेडणे तालुक्याचा सर्वाधिक तर मुरगाव तालुक्याचा सर्वांत कमी
पर्वरी (प्रतिनिधी)
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या मार्च 2023 दहावीच्या परीक्षेचा निकाल 96.64 टक्के लागला असून यंदाही उत्तीर्ण टक्केवारीत मुलांपेक्षा मुलीनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा निकालात 4 टक्के वाढ झाली आहे. यावर्षी 187 शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून त्यातील 49 सरकारी तर 128 अनुदानित शाळा तर 10 खासगी संस्थांच्या शाळांचा समावेश आहे. गेल्या वर्षीप्रमाणे दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. पहिले सत्र 29 नोव्हेंबर 22 ही परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात आली होती तर दुसरे सत्र ता.1 एप्रिल 23 रोजी लेखी पद्धतीने घेण्यात आली होती.
यावर्षी या परीक्षेत 19958 इतके विद्यार्थी परीक्षेत बसले होते.त्यातील 19288 इतके विद्यार्थी पास झाले. एक विद्यार्थी परीक्षेत बसला नाही. एकूण सरासरी 96.64 टक्के इतकी आहे. यावर्षी 10071 पैकी 9706 इतके मुलगे पास झाले. त्यांची टक्केवारी 96.37 इतकी आहे. तर 9887 पैकी 9582 इतक्या मुली पास झाल्या. त्यांची टक्केवारी 96.92 इतकी आहे. एक मुलगी परीक्षेत बसली नाही. खासगी विद्यार्थी 53 परीक्षेला बसले होते त्यातील 29 विद्यार्थी पास झाले त्यांची सरासरी 54.72 इतकी टक्केवारी झाली. आयटीआय विद्यार्थी 18 परीक्षेला बसले होते त्यातील 12 विद्यार्थी पास झाले त्यांची सरासरी 66.67 इतकी टक्केवारी झाली. नापास विद्यार्थी 446 परीक्षेला बसले होते 252 इतके विद्यार्थी पास झाले.त्यांची 56.50 इतकी टक्केवारी झाली.425 विशेष विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 418 विद्यार्थी पास झाले त्यांची सरासरी 98.35 इतकी टक्केवारी झाली. 428 विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. एनएसस्कूएफ विषय घेऊन 3863 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 3781 विद्यार्थी पास झाले. त्यांची सरासरी 97.88 टक्के झाली आहे. प्री वॉकेशनल विषय घेऊन 341 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 308 विद्यार्थी पास झाले त्यांची सरासरी 90.32 टक्के इतकी झाली आहे. पुढच्या वर्षापासून प्री वॉकेशनल विषय बंद करण्यात आले आहेत. स्पोर्ट मेरीट गुण 7151 इतक्या विद्यार्थ्यांना मिळाले. पण त्यातील 197 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला.
यंदा एकूण 31 केंद्रातून ही परीक्षा घेण्यात आली होती. सर्वाधिक विद्यार्थी सालसेत केंद्रातून 4187 इतके परीक्षेत बसले होते. त्यातील 4047 इतके विद्यार्थी पास झाले. त्यांची सरासरी 96.66 इतकी टक्केवारी झाली. तर सर्वात कमी विद्यार्थी धारबंदोडा केंद्रातून 321 इतके विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यातील 313 विद्यार्थी पास झाले. त्यांची सरासरी 97.51 इतकी टक्केवारी झाली. यावर्षी पेडणे तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला असून त्यांची सरासरी 98.84 इतकी टक्केवारी तर मुरगाव तालुक्याचा सर्वांत कमी निकाल लागला असून त्यांची सरासरी 95.16 इतकी टक्केवारी झाली आहे.
गेल्या पाच वर्षाचा निकाल पुढीलप्रमाणे : 2018 मध्ये 91.27 टक्के, 2019 मध्ये 92.47 टक्के, 2020 मध्ये 92.69 टक्के, 2021 मध्ये 99.72 आणि 2022 मध्ये 92.75 टक्के असा होता.
यावर्षी 187 शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून त्यातील 49 सरकारी, 128 अनुदानित शाळा तर 10 खासगी शाळांचा समावेश आहे.
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची नावे पुढीलप्रमाणे : होली क्रॉस बस्तोडा,ज्ञानप्रसारक विद्यालय म्हापसा, सरकारी हायस्कूल नानोडा, सेंट एलिझाबेत हायस्कूल पोंबुर्फा, श्री शांतादुर्गा विद्यालय पीर्ण, अवर लेडी ऑफ रेमेडीस हायस्कूल नेरूल, विद्यानिकेतन हायस्कूल कळंगूट, होली फॅमिली हायस्कूल पर्वरी, श्री शांतादुर्गा विद्यालय सडये शिवोली ,सुनंदाबाई बांदोडकर हायस्कूल साल्वादोर दी मुंद ,त्रिम्प हायस्कूल (दत्ताराम चोपडेकर हायस्कूल) पर्वरी, सेंट जोसफ हायस्कूल कळंगूट , महात्मा ज्येतिराव फुले हायस्कूल कोलवाळ, च्युबी चिकस स्पिनग वेल्ली हायस्कूल पर्वरी, संजय स्कूल पर्वरी, ज्ञान विकास स्कूल पर्वरी, डिवाईन मर्सी हायस्कूल म्हापसा, कॉर्नर स्टोन हायस्कूल करासवाडा म्हापसा, सरकारी हायस्कूल मुळगाव, सरकारी हायस्कूल अस्नोडा , श्रीमती हायस्कूल वेळगे , सरकारी हायस्कूल आमोणा ,सेंट जॉन ऑफ क्रॉस हायस्कूल सांखळी, पैरा हायस्कूल , सरकारी हायस्कूल कोलवाळ, महालक्ष्मी हायस्कूल कुडणे सांखळी, सरकारी हायस्कूल शिरगाव, सरकारी हायस्कूल नावेली , सरकारी हायस्कूल कासरपाल, सरकारी हायस्कूल सुर्ला ,गणेश विद्यालय सांखळी, जे जे राणे हायस्कूल डिचोली, सरकारी हायस्कूल मुळगाव, डॉ. के. बी . हेडगेवार हायस्कूल सांखळी, श्री मल्लिकार्जुन हायस्कूल काणकोण, निराकार विद्यालय माशे ,श्री दामोदर विद्यालय लोलये, श्री श्रद्धानंद विद्यालय पैंगीण , सरकारी हायस्कूल आंगोद, सेंट सेबेस्टीन हायस्कूल लोलये, सेंट अॅन्थोनी हायस्कूल गालजीबाग , सरकारी हायस्कूल गावडोंगरी, सरकारी हायस्कूल खोतीगाव , सरकारी हायस्कूल खोल, स्नेस तुडल हायस्कूल गावडोंगरी, श्री बलराम हायस्कूल पैंगिण ,गुऊकुल हायस्कूल खोला ,बलराम हायस्कूल श्रीथळ ,सेंट जोसफ वास्को, सेंट टेरेझा हायस्कूल वास्को, म्युनिसिपल हायस्कूल वास्को, मुरगाव हायस्कूल , अवर लेडी हायस्कूल वास्को, अवर लेडी ऑफ कांडेलिया हायस्कूल बायणा,
शांतादुर्गा हायस्कूल सांकवाळ, शांतादुर्गा हायस्कूल मुरगाव, केशव स्मृती हायस्कूल ,विद्या विहार हायस्कूल, सेंट अॅन हायस्कूल, व्हायकाऊंट हायस्कूल, सरकारी हायस्कूल,आगरवाडा, सरकारी हायस्कूल तोरसे, हरमल पंचक्रोशी हायस्कूल, भगवती हायस्कूल,लोकशिक्षण हायस्कूल,कमलेश्वर हायस्कूल, सरकारी हायस्कूल चांदेल, मांगिरीष विद्यालय यांचा समावेश आहे. तसेच संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन- पर्वरी, लोकविश्वास प्रतिष्ठान मिडल स्कूल-ढवळी फोंडा, लोक विश्वास प्रतिष्ठान विराणी हायस्कूल ढवळी फोंडा, सेंट झेविअर अकादमी जुने गोवा या विशेष मुलांच्या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाची पडताळणी करायची असेल तर त्यांनी योग्य फी भरून ता. 25 मे पासून अर्ज करू शकतात. पुरवणी परीक्षा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत सचिव व्ही. बी. नाईक, उपसचिव भरत चोपडे, शीतल कदम यांची उपस्थिती होती.









