प्रतिनिधी/ पणजी
गोवा शालांत मंडळाच्या (दहावी) परीक्षा 1 एप्रिलपासून सुरू झाल्या असून 22 एप्रिल पर्यंत चालणार आहेत.
राज्यभरातील 31 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत असून सुमारे 20489 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. या परीक्षांचा निकाल येत्या जून महिन्यात जाहीर होणे अपेक्षित आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टर्म परीक्षांच्या कामगिरीवर आधारून निकाल निश्चित करण्यात येणार असून दोन्ही परीक्षांसाठी स्वतंत्र गुणपत्रिका जारी करण्यात येणार









