चौके/वार्ताहर
10th anniversary of Sri.Dev Giroba temple rock climbing in excitement!
साळेल हितवर्धक मंडळ,मुबंई व स्थानिक ग्रामस्थाच्यातर्फे उभारण्यात आलेल्या श्री.देव गिरोबा मंदिर नूतणीकरणाचे काम पुर्ण झाल्यावर या मंदिराचा २ मे २०१३ मध्ये कलशारोहणाचा सोहळा साजरा झाला होता.या सोहळ्याला दिनांक २मे२०२३ रोजी १० वर्षे पूर्ण झाले.या सोहळ्याचा दहावा वर्धापन दिन सोहळा दिनांक २मे रोजी भाविकांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी संपुर्ण श्री.गिरोबा मंदिराच्या परीसर तिर्थक्षेत्रमय झालेला होता.सपुर्ण साळेल गावातील वातावरण भक्तीमय झालेला होतो.सकाळ पासून श्री.गिरोबाचा गजर साळेल गावामध्ये चालू झालेला होता.साळेल गावाला एक प्रकारे आगळे वेगळे रूप प्राप्त झालेले होते.या वर्धापन दिनाचे सर्वात चांगले आकर्षण ठरले ते या गावातील स्थानिक कलाकरानी सादर केलेले करमणूकीचे कार्यक्रमया वर्धापन सोहळ्या निमित्त सकाळी ८वाजता श्री.देव लिंगेश्वर मंदिरातून श्री.गिरोबाच्या पालखीने प्रस्थान केले.या पालखी मिरवणूकीमध्ये साळेल गावातील लहान मोठ्या लोकांनी व महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावरती सहभाग घेतला होता. ढोल ताश्याच्या व फटाक्याच्या आतषबाजीमध्ये पालखीचे आगमन श्री.गिरोबा मंदिरामध्ये झाले.त्यानतंर मान्यकाराच्या प्रमुख उपस्थितीत गिरोबा मंदिर या ठिकाणी श्रींचीपूजा,लघुरूद्र,अभिषेक व धार्मिक विधी स्थानिक पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी श्री.सत्यानारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.त्यानतंर मंदिराच्या परिसरामध्ये पालखी प्रदक्षिणाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी असंख्य भाविकांनी महाप्रयादाचा लाभ घेतला.यावेळी स्थानिक भजनी मंडळानी आपली भजने सादर केली.त्याच प्रमाणे आंबडोस कदमवाडीतील महिलांनी फुगडी सादर करून सर्वाची मने जिंकली.
यावेळी गावातील जेष्ठ नागरीकांचा भव्य सत्कार मंडळाच्यावतीने मान्यवराच्या शुभहस्ते करण्यात आला.त्याच प्रमाणे साळेल गावातील गुणवंत मुलाचा,माजी सैनिकांचा व उच्य पदावरती नोकरी करून गावाला नावलौकीक मिळवून देणार्या सर्वाचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी व्यासपीठावरती सरपंच रविद्र साळकर,साळेल हितवर्धक समाज,मुबंईचे अध्यक्ष शिवाजी गावडे,उपाध्यक्ष दिलीप गावडे,सचिव सुनिल गावडे,खजिनदार मंगेश गावडे,रविंद्र गावडे,सुहास गावडे,राजू जामदार,अनिल गावडे,गिरीश गावडे,नाना परब,अरूणचद्र गावडे,गजानन गावडे,राघो गावडे,राजाराम गावडे,रविंद्र गावडे,भानजी गावडे,साबाजी गावडे,संजय गावडे,विठोबा गावडे,अमित गावडे,गजानन देसाई व अन्य मान्यवर उपस्थितीत होते.यावेळी शिवाजी गावडे,सरपंच रविंद्र साळकर,पत्रकार संतोष गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी दिपक नाईक,बांबू हाॅटेलचे मालक संजय गावडे,राजेश पवार,पत्रकार संतोष गावडे,तारक कांबळी,हिद मंडप डेकोरेटर्स गोठ्या मेस्त्री,जि.प.वित्त अधिकारी पल्लवी गावडे,डाॅ.स्नेहल गावडे यांचा सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गजानन देसाई,चौके सरपंच गोपाळ चौकेकर,गोट्या सावंत,प्रशांत साळूंखे याचाही सत्कार करण्यात आला









