नवी दिल्ली
विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये 10 हजार 689 कोटी रुपयांची बाजारात भर टाकली आहे. आगामी काळातही शेअरबाजारात काहीशी चढउताराची परिस्थितीतच राहील असे तज्ञांचे मत आहे. 26 ऑगस्टपर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी वरील गुंतवणूक केली असल्याचे समजते. गेल्या महिन्यामध्ये पाहता भारतीय शेअर बाजारामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 40 हजार कोटी प्रत्येकी गुंतवले आहेत.









