मुंबई :
सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी एसीसीने आपल्या आर्थिक वर्ष 2024 मधील पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीने एप्रिल ते जून 2023 या काळात 446 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. याआधीच्या वर्षात समान अवधीत कंपनीने 227 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. या अवधीत कंपनीने 5 हजार 201 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला असून मागच्या वर्षीच्या समान अवधीच्या तुलनेत महसूल 16 टक्के वाढीव आहे.









