कवठेमहांकाळ :
श्री महांकाली साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संचालक मंडळाच्या सतरा जागांसाठी १०४ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाले. कारखान्याच्या अध्यक्षा अनिताताई सगरे, युवा नेते शंतनू सगरे, ज्येष्ठ नेते जयसिंग शेंडगे, मिलिंद कोरे, दीपकराव ओलेकर, अशोक जगदाळे, रामचंद्र पाटील, निखिल बनसोडे या प्रमुख उमेदवारांचा अर्ज दाखल केलेल्यांमध्ये समावेश आहे.
७ फेब्रुवारीनंतर अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. मंगळवार ११ ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. त्यामुळे ११ अखेर १०४ जणांनी अर्ज दाखल केले. १४ तारखेला छाननी असून १७ पर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.
विजय पाटील, राजेंद्र पाटील, आप्पासाहेब कोळेकर, बाळासाहेब पाटील, सुरेश पाटील, जीवनराव भोसले, किरण भोसले, संजय पाटील, काशिलिंग कोळेकर, भीमराव कोळेकर, भानुदास पाटील, रमेश भोसले, भानुदास कोरे, संभाजी पाटील, अनुराधा सगरे, सुहास पाटील, आदगोंडा बंडगर, संभाजी पवार, आण्णासो कोळेकर, अविराजे शिंदे, रामचंद्र पाटील, कुमार पाटील, शशिकला पाटील, जनार्दन पाटील, कोंडिबा घागरे, अनिल लोंढे, प्रविण पवार, गजानन कोठावळे, प्रशांत कदम यांच्यासह १०४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.








