नवी दिल्ली
खासगी क्षेत्रातील बँक आयसीआयसीआय बँकेने दुसऱ्या तिमाहीत 10,261 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. एकंदर निव्वळ नफ्यामध्ये बँकेने 36 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. तर दुसरीकडे निव्वळ व्याज उत्पन्नातही बँकेने 24 टक्के वाढ करत ते 18,308 कोटी रुपये इतके मिळवले आहे. सोबत एकूण उत्पन्नही 31 टक्के इतके वाढत ते 40,697 कोटी रुपयांवर पोहचले आहे. व्यवसायांना कर्ज देण्याच्या प्रमाणात 30 टक्के वाढ झाली आहे.









